चीनमध्ये काचेचे पूल पेलतो ८०० लोकांचे वजन

glass
झांगुजियाजी : चित्रविचित्र गोष्टी या जास्त चीनमध्येच होत असतात. आता झांगुजियाजी येथील नॅशनल पार्कमध्ये काचांपासून पूल तयार करण्यात आला आहे. हा पूल पाहून कुणीही चकित होते. जमिनीपासून ९८० फूट उंचीवर असलेला हा काचेचा पूल या वर्षी जुलैमध्ये पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. या पुलाचा तळाचा भागदेखील काचेचाच असून नॅशनल पार्कमधील दोन डोंगरांना तो जोडतो. या पुलाचे नाव युआनडुआन असे ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ ढगांच्याही पलीकडे. ग्लास बॉटम असलेल्या या पुलाची लांबी १,४१० फूट रुंदी १९ फूट इतकी आहे.

हा जगातील सर्वात उंच लांब काचेचा पूल आहे. सर्वात उंच बंजी जंपिंगचा प्लॅटफॉर्म म्हणूनही याचा वापर होऊ शकेल. या पुलापुढे अमेरिकेतील ग्रँड कॅन्यन स्कायवॉक खुजा वाटतो. जो जमिनीपासून १७८ फूट उंच दिसतो. या पुलावरून संपूर्ण नॅशनल पार्क पाहता येऊ शकते. या पुलाचे डिझाइन इस्रायलचे वास्तुरचनाकार हॅम डॉटन यांनी केले आहे. त्यावर ८०० लोक एकाच वेळी उभे राहू शकतील.

Leave a Comment