आता १५ मिनिटांत मुंबई ते एलिफंटा प्रवास

elephanta
नवी मुंबई : मुंबईच्या गेट ऑॅफ इंडियावरुन फेरी बोटने एलिफंटावरील गुहा पाहण्यासाठी पर्यटकांना जावे लागत होते. हा प्रवास एक ते दीड तासांचा आहे. मात्र आता फक्त १५ मिनिटांमध्ये एलिफंटाला पोहोचता येणार आहे आणि ते ही नवी मुंबईतून. हिंदजल प्रवासी वाहतूक सहकारी संस्थेने सीबीडी ते एलिफंटा प्रवासी बोट सुरू केली असून तिच्या दिवसातून दोन फे-या ठेवण्यात आल्या आहेत.

आधुनिक अशी व्हिएतनाम मेड बोट असून ती ३५ ते ४० नॉटिकल स्पीडने चालते. त्यामुळे फक्त १५ मिनिटांत नवी मुंबईवरुन एलिफंटाला पोहोचता येणार आहे. या बोटीमध्ये एकून ४५ प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे वातानुकूलित सिटही यामध्ये ठेवण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई, पनवेल, ठाणे आणि इतर भागातील लोकांना जगप्रसिद्ध एलिफंटा लेण्या पाहायला जाण्यासाठी ट्रेनचा प्रवास करून मुंबईच्या गेट ऑॅफ इंडियाला जावे लागत होते. दररोज सकाळी ९ वाजता पहिली बोट सुटेल आणि तीच बोट दुपारी १ वाजता प्रवाशांना परत घेऊन येईल. यानंतर दुपारी २ वाजता दुसरी बोट सुटेल ती सायंकाळी ६ वाजता परत येईल.

Leave a Comment