ओप्पोचे आर सेव्हन व प्लसची विक्री सुरू

oppo
चीनी स्मार्टफोन कंपनी ओपोने त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन बिजिंगमधील कार्यक्रमात सादर केले आहेत. आर सेव्हन व आर सेव्हन प्लस नावाने आलेले हे दोन्ही फोन अनुक्रमे २४९९ युनान ( २५७०० रूपये) व २९९९ युनान( ३०९०० रूपये) त चीन ई रिटेलर जेडी डॉट कॉमवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले गेले आहेत. दोन्हीही फोनसाठी ३ जीबी रॅम, अँड्राईड ओएस, मेटालिक बॉडी, ग्लास कव्हर फ्रंट पॅनल दिले गेले आहे.

आर सेव्हन साठी ५ इंची फुल एचडी डिस्प्ले, ३ कपॅसिटिव्ह कीज म्हणजे मेनू, होम व बॅक बटण, १६ जीबी इंटरनल मेमरी, कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, १३ एमपीचा रियर तर ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे तर आर सेव्हन प्लस फॅब्लेटसाठी ६ इंची स्क्रीन, ३२ जीबी मेमरी दिली गेली आहे. सिल्व्हर व गोल्ड अशा दोन रंगात हे फोन उपलब्ध आहेत.

Leave a Comment