नासाच्या अवकाशातील घरासाठी २.२५ कोटी डॉलर्सचे बक्षीस

nasa
वॉशिंग्टन : नासाने २.२५ कोटी डॉलर्सचे अवकाशातील घरकुलाचे डिझायनिंग करणा-याला इनाम जाहीर केले आहे. या आवासाचे थ्री डी प्रिंटेड डिझाईन नासाला सादर करावे लागेल. अवकाशातील संशोधनासाठी योग्य असे हे घर असावे. अवकाशातील परिस्थितीस अनुकूल असे घटक यासाठी वापरावे लागतील हेच यातील मोठे आव्हान आहे. नासाने खुल्या पद्धतीने हे आव्हान अवकाश अभ्यासकांसमोर ठेवले आहे. शिवाय बांधणीच्या तंत्रावरही मूलभूत संशोधन करणे गरजेचे आहे. पृथ्वीच्या कक्षेबाहेर शाश्वत निवासस्थानाचे हे आव्हान पूर्ण केल्यास संशोधनाला महत्त्वाची कलाटणी मिळेल, अशी अटकळ नासाने व्यक्त केली. सप्टेंबरच्या अखेरीस या स्पर्धेचा पहिला टप्पा सुरू होईल.

यात डिझाइनिंगला महत्त्व असेल. २७ सप्टेंबर रोजी यातील पहिल्या ३० डिझाईनची निवड करण्यात येईल. न्यूयॉर्क येथे होणा-या वल्र्ड मार्केट फेअरमध्ये पहिल्या ३० डिझायनरला प्रत्येकी ५० हजार डॉलर्सचा पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेच्या पुढील टप्प्यात बांधकाम साहित्यावर लक्ष देण्यात येईल.

Leave a Comment