कॅबिनेटची पीएसएलव्ही मोहीम सुरु ठेवण्याला मंजुरी

pslv
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाने पोलर सॅटेलाईट लाँच वेहिकल ( पीएसएलव्ही) मोहीम सुरु ठेवण्याला मंजुरी दिली आहे. भविष्यात पीएसएलव्ही-सी-३६ ते पीएसएलव्ही-सी५० असे १५ उपग्रह प्रक्षेपित करणे नियोजित आहेत. ते सुरु ठेवण्याला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. यासाठी तब्बल ३ हजार ९० कोटींचा खर्च येणार आहे.

पृथ्वीचे परीक्षण, दूसंचार, अंतराळ विज्ञान आणि इतर व्यावसायीक प्रक्षेपण सेवा करारांसाठी उपग्रह प्रक्षेपण क्षमता समर्थ करण्याचा उद्देश सरकारसमोर आहे. वर्षाला चार ते पाच उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे. २०१७-२०२० दरम्यान १५ उड्डाण नियोजित आहेत. पीएसएलव्हीला २००८ मध्ये मंजुरी मिळाली होती. यामुळे भारत उपग्रहांचे प्रक्षेपण स्वतः करु लागला. पीएसएलव्हीने आतापर्यंत २७ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.

Leave a Comment