फेसबुक मॅसेंजरचे व्हिडिओ कॉलिंग फीचर लॉन्च

faceboook
मुंबई: जगभरातील देशांमध्ये फेसबुकने आपल्या मॅसेंजर अॅपवर व्हिडिओ कॉलिंग फीचर लॉन्च केले आहे. फेसबुकने एक महिन्यापूर्वी पहिले हे फीचर अमेरिका, कॅनडा आणि फ्रान्ससह १८ देशांमध्ये लॉन्च केले होते. आता संपूर्ण देशात हे लॉन्च केले आहे.

फेसबुक मॅसेजिंगचे व्हॉइस प्रेसिडेंट डेविड मार्क यांनी सांगितले की, आम्हाला सांगण्यात आनंद होतो की, आम्ही जगभरात आपल्या मॅसेंजर अॅपवर व्हिडिओ कॉलिंग फीचर लॉन्च केले आहे. यासोबतच आम्ही काही देशांमध्ये हे लॉन्च करण्याच्या प्रक्रियेवर काम करतो आहे. आपण आपल्या ios आणि लेटेस्ट अँड्रॉईड व्हर्जन अपडेट करून हे फीचर मिळवू शकता. यापूर्वीपासून व्हिडिओ कॉलिंगची सुविधा मायक्रोसॉफ्ट स्काइप, गूगल हँगआऊट आणि अॅपलच्या फेसटाइमवर मिळते आहे.

Leave a Comment