एम्सच्या डॉक्टरांना सर्वात मोठा किडनी ट्यूमर काढण्यात यश

aiims
नवी दिल्ली – एम्सच्या डॉक्टरांना सर्वात मोठा किडनी ट्यूमर काढण्यात यश आले असून जवळपास ५ किलो वजनाचा हा ट्यूमर डॉक्टरांनी यशस्वीपणे बाहेर काढला आहे. किडनीच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णावरील शस्त्रक्रियेदरम्यान भारतीय डॉक्टरांना हे यश प्राप्त झाले आहे. याआधी २.५ किलो वजनाचा किडनी ट्यूमर सर गंगाराम हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी बाहेर काढला होता. अशी माहिती एम्सचे डॉ. एम डी. रे यांनी दिली आहे.

के. एल. दास ( वय-६६ ) यांना किडनीचा कर्करोग होता. गेल्या २५ वर्षांपासून दास हे नवी दिल्लीत राहत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून ट्यूमर झपाट्याने वाढत होता. तसेच कर्करोग हा फुफ्फुसांपर्यंत पसरला होता. त्यामुळे शस्त्रक्रिया हा एकच पर्याय डॉक्टरांसमोर होता, असे रे यांनी सांगितले. १४ मे रोजी दास यांच्यावर एम्समध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल साडेपाच तास या शस्त्रक्रियेला लागले. त्यानंतर दास हे दिवसभर अतिदक्षता विभागात राहिले. सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना उद्या रुग्णालयातून सुट्टी मिळणार आहे, असेही रे यांनी सांगितले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment