साऊथगेट ब्रिजवरील लव्ह लॉक्स काढली जाणार

lovelock
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मधील पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धीस आलेल्या साऊथगेट ब्रिजवर लावली गेलेली २० हजार लव्ह लॉक्स काढून टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या ब्रिजवर प्रेमी युगलांनी एकदुसर्‍याची साथ शेवटपर्यंत देण्याचे प्रतीक म्हणून स्वतःची नांवे लिहून ही कुलुपे पुलच्या केबलमध्ये अडकवली आहेत. अशा प्रकारे येथे कुलुपे अडकविल्यावर त्याची किल्ली फेकून देण्याची पद्धत आहे.

मेलबोर्न नगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या कुलपांच्या वजनामुळे अनेक ठिकाणी पुलाची केबल खराब झाली आहे. परिणामी पुलाची सुरक्षाच धोक्यात आली आहे. मेयर रॉबर्ट डॉयल म्हणाले की पुलाला धोका होणे अथवा पुल कोसळणे आम्हाला परवडणारे नाही त्यामुळे ही कुलुपे काढून टाकण्याचा निर्णय घेतला गेला आहे. भले अनेक पर्यटक केवळ कुलुपे पाहण्याच्या अपेक्षेने येथे येत असतीलही पण तरीही हा निर्णय घेणे भाग पडते आहे.

पॅरिसमध्ये या प्रकारची प्रथम २००८ साली सुरवात झाली. तेथेही प्रेमी युगुलांनी अशी लव्ह लॉक तेथील एका पुलावर लावली होती. तेथे लावल्य गेलेल्या ७ लाख लव्ह लॉकसमुळे अखेर तो पूल कोसळला असेही समजते.

Leave a Comment