आता गरज नाही एसटीडी कॉलसाठी 0 आणि +91 डायल करण्याची

std
मुंबई : देशात कुठेही एसटीडी कॉल करायचे असल्यास आता 0 किंवा +91 डायल करावे लागणार नाही. हा महत्त्वपूर्ण निर्णय देशातील काही टेलिकॉम ऑपरेटर्सनी घेतला आहे. नॅशनल मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) लागू करण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

ही सुविधा एअरटेल, व्होडाफोन आणि एमटीएनलने सुरु केली असून या टेलिकॉम कंपन्यांचे ग्राहक आता संपूर्ण देशात थेट मोबाईल नंबर डायल करु शकता. ही सुविधा अद्याप देशातील सर्व ऑपरेटर्सनी लागू केली नाही. मात्र लवकरच सर्व ऑपरेटर्सना ही सुविध लागू करावी लागणार आहे.

ही सुविधा ज्या टेलिकॉम कंपन्यांनी देण्यास सुरुवात केली आहे, त्यामध्ये एअरटेल, व्होडाफोन आणि एमटीएनएल या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या ग्राहकांना देशात कुठेही एसटीडी कॉल करताना नंबरआधी 0 आणि -91 डायल करण्याची गरज नाही.

Leave a Comment