स्पाइसने आणला सर्वात स्वस्त स्मार्टफोन

spice
मुंबई: मोबाइल बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याची चढाओढ लागली असल्यामुळे भारतीय कंपनी स्पाइसने फायर वन Mi-FX2 हा स्वस्त स्मार्टफोन लाँच केला असून या स्मार्टफोनची कंपनीने किंमत अवघी रु. २,७९९ एवढी निश्चित केली असून या स्मार्टफोनची खरेदी आपण स्पाइसच्या वेबसाइटवरुन देखील करु शकता.

स्पाइस फायर वन Mi-FX2 स्मार्टफोनचे फिचर्स:
३.५ इंचाचा डिस्प्ले, रेझ्युलेशन ३२० x ४८० पिक्सल, ड्युल सिम सपोर्ट, फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टम १.४, रिअर कॅमेरा २ मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा १.३ मेगापिक्सल, फायर वन Mi-FX 2 प्रोसेसर 1GHz , २५६ एमबी रॅम, इंटरनल मेमरी ५१२ एमबी तर ३२ जीबी पर्यत मेमरी वाढविण्याची क्षमता, बॅटरीची क्षमता 1100mAh एवढी आहे.

Leave a Comment