देशातील २१ विद्यापीठे आहेत बोगस; यूजीसीने केला पर्दाफाश

ugc
नवी दिल्ली : देशातील २१ विद्यापीठे बनावट असल्याची यादी विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात ‘युजीसी’ ने आपल्या वेबसाईटवर जाहीर केली असून यामध्ये नागपूरमधील एका विद्यापीठाचा समावेश आहे. सर्वाधिक बनावट विद्यापीठे ही एकट्या उत्तर प्रदेशात असल्याचे या यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षण क्षेत्रातील माफियांना चाप लावण्याचे युजीसीने काम केले असून देशभरातील बनावट विद्यापीठांचा पर्दाफाश केला आहे. युजीसीने देशाच्या ९ राज्यात २१ विद्यापीठे बनावट असल्याची यादी जाहीर केली आहे. या विद्यापीठात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना मिळणारी पदवी ही मान्यताप्राप्त राहणार नाही असे सांगण्यात आले आहे. युजीसीने वेबसाईटवर ही बनावट विद्यापीठाची यादी जाहीर केल्यानंतर खळबळ उडाली आहे.

या बनावट विद्यापीठ यादीत दिल्लीतील कमर्शिल विद्यापीठ लिमिटेड दरियागंज, युनाइटेड नेशन्स विद्यापीठ, व्होकेशन युनिव्हर्सिटी, एडीआर-सेन्त्रिक ज्यूरिडिकल युनिव्हर्सिटी-एडीआर हाउस, इंडियन इन्सिटयुट ऑफ सायन्स अण्ड इजिनिअरिंग, बिहार- मैथिली युनिव्हर्सिटी दरभंगा, कर्नाटक – बडागानवी सरकार वल्र्ड ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटी बेळगाव, केरळ – सेंट जॉन, कृष्णट्टम, तमिलनाडू – डीडीबी संस्कृत युनिव्हर्सिटी, पुत्तुर, त्रिची. पश्चिम बंगाल – इडियन इन्स्टिट्युट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसीन.कोलकाता, उत्तरप्रदेश – वाराणेसय संस्कृत युनिव्हर्सिटी वाराणसी यूपी, जगतपुरी, दिल्ली महिला ग्राम विद्यापीठ,युनिव्हर्सिटी अलाहाबाद गांधी हिंदी विद्यापीठ अलाहाबाद, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपथी कानपूर, नेताजी सुभाषचंद्र बोस युनिव्हर्सिटी अचलताल, अलीगड,उत्तर प्रदेश युनिव्हर्सिटी मथुरा, महाराणा प्रताप शिक्षा निकेतन युनिव्हर्सिटी प्रतापगड, इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद, इन्स्टिट्युटशनल एरिया,खोडा माकनपूर नोएडा, गुरुकुल युनिव्हर्सिटी वृदांवन मथुरा, महाराष्ट्र-नागपूर- राजा अरेबिक युनिव्हर्सिटीचा समावेश आहे.

Leave a Comment