येऊ घातलेय फोर डी प्रिंटींग तंत्रज्ञान

4d-tech
मेलबर्न – थ्री डी प्रिंटींग तंत्रज्ञानाने घडविलेली क्रांती अजून पुरी पचनी पडायच्या आतच थ्री डी प्रिंटींग जुने वाटेल असे फोर डी तंत्रज्ञान संशोधकांनी विकसित केले असून हे तंत्रज्ञान कोणती क्रांती घडविणार हे लवकरच दिसून येणार आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशा वस्तू बनू शकणार आहेत ज्या परिस्थितीनुरूप आपला आकार बदलू शकतील. थ्रीडी प्रिंटींग साठी लागणार्‍या पदार्थांचा अभ्यास केला जात असतानाच फोर डी साठी उपयुक्त पदार्थांवर संशोधन सुरू झाले होते असे सांगितले जात आहे.

या तंत्रज्ञानात पाणी व आग अशा बाहेरच्या प्रभावांच्या सहाय्याने पदार्थाला नवे संरचना रूप देता येते. थ्रीडी तंत्रज्ञानात आपल्याला हवा तोच आकार बनविता येतो तर फोर डी मध्ये एका आकारातून दुसरा आकार आपोआप बनू शकतो. याचा उपयोग प्रामुख्याने चिकित्सा, निर्माण शास्त्र, स्वयंचलीत यंत्रे, रोबो अशा अनेक क्षेत्रात होऊ शकणार आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वॉलोगांग येथील संशोधकांनी सध्या चिकित्सा सॉफ्टवेअर क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले असून त्यात अशा व्हॉल्व्हची निर्मिती केली जात आहे जो पाण्याच्या तापमानावरही प्रतिक्रिया देऊ शकणार आहे.

Leave a Comment