गाईच्या शेणावर चालणार टोयाटोची मिराई

mirai
कारसाठी हायड्रोजनचा वापर इंधन म्हणून करण्याचा प्रयत्न जगभरात सुरू असताना जपानच्या टोयाटो मोटर्सने फ्यूएलसेल कार मिराईच्या जाहिराती सुरू केल्या आहेत. ही कार सर्व इंधनांवर चालू शकणार आहे त्याचप्रमाणे गाईच्या शेणापासून बनणार्‍या गॅसवरही ती चालू शकणार असल्याचा दावा केला आहे. जागतिक वसुंधरा दिनापासून या जाहिराती झळकू लागल्या आहेत. जगभराच्या बाजारात कंपनी ही कार लवकरच आणत आहे.

गाईच्या शेणापासून वेगळ्या केलेल्या हायड्रोजन वर ही कार चालणार आहे. हायड्रोजन पॉवर फयूएलवर चालणार्‍या या पहिल्याच कारचे मास प्रॉडक्शन लवकरच सुरू केले जात आहे. सतत २० वर्षांच्या संशोधननंतर आणि त्यावर लाखो डॉलर्सचा खर्च केल्यानंतर ही कार बनली असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

या कारला पॉवर देण्यासाठी ११४ किलोवॅट फ्यूएल सेल व ११३ किलोची इलेक्ट्रीक मोटर दिली आहे. यात हायड्रोजन व ऑक्सिजन मिक्स करून पॉवर निर्माण केली जाते. या प्रक्रियेत शुद्ध पाणीही तयार होते. १० सेकंदात ही कार ० ते १०० किमीचा वेग घेऊ शकते आणि फ्यूएल भरल्यावर ५५० किमी प्रवास करू शकते. सध्या जपानमध्ये १० हायड्रोजन गॅस स्टेशन आहेत मात्र ही संख्या या वर्षअखेर १०० वर नेली जाणार आहे. जपानमध्ये या कारची किंमत ३५ लाख रूपयांपर्यंत असली तरी भारतात ती कमी असू शकते कारण सरकार अशा कारवर इंटेन्सिव्ह देण्याचा विचार करते आहे असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment