आता ‘यू-ट्यूब’ चे साम्राज्य फेसबुकमुळे धोक्यात

facebook
न्यूयॉर्क : आता फेसबुकने ऑनलाईन व्हीडीओ सेवा देणा-या ‘यू-ट्यूब’ च्या साम्राज्याला जबरदस्त टक्कर द्यायला सुरुवात केली आहे. दहा वर्षांपूर्वी ‘यू-ट्यूब’ वर जेव्हा पहिला व्हीडीओ अपलोड झाला होता तेव्हापासून ते आजतागायत या कंपनीची ऑनलाईन व्हीडीओ मार्केटवर एकहाती सत्ता होती पण सोशल नेटवर्किंगच्या जगामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणा-या फेसबुकने संवादाची सारी परिमाणेच बदलून टाकली आहेत. विशेष म्हणजे ब-याच बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आता व्हीडीओ प्रमोशनसाठी फेसबुकचाच आधार घेतल्याचे दिसून येते.

एका दिवसात तब्बल चार अब्ज लोक फेसबुकवरील एक व्हीडीओ पाहतात. जानेवारीमध्ये हेच प्रमाण एक अब्ज एवढेच होते. व्हीडीओ पाहणा-या नेटिझन्सच्या संख्येत चक्क तीन अब्जांनी वाढ झाल्याने कंपनीचा रोखे बाजारातील भावदेखील चांगलाच वधारला आहे. एकीकडे फेसबुकच्या तिमाही नफ्यामध्ये मोठी घट झाली असताना कंपनीच्या रोख्यांच्या भावावर याचा कसलाही परिणाम झालेला नाही. व्हीडीओ जाहिरातींसाठी फेसबुक हेच परिणामकारक माध्यम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment