कर्मचा-यांसाठी ‘गुगल’ ही देशातील सर्वोत्तम कंपनी

google
नवी दिल्ली : ‘गुगल’ ही कर्मचा-यांच्या दृष्टीने देशातील सर्वोत्तम आणि आकर्षक कंपनी असल्याचे ‘रँडस्टँड अ‍ॅवॉर्ड सर्वे’ मध्ये दिसून आले आहे. ‘गुगल’ ने ‘सोनी इंडिया’ ला पिछाडीवर टाकून हा बहुमान प्राप्त केला आहे.

कर्मचा-यांना देण्यात येणा-या वेतनाव्यतिरिक्त कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणारे वातावरण, वर्क कल्चर, पुढे जाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणा-या संधी व कर्मचारी टिकून राहण्याचे प्रमाण आदी​ निकषांवर ‘गुगल’ ची ​निवड करण्यात आली आहे.

‘कर्मचा-यांनी आपल्याकडेच टिकून राहावे यासाठी कामाची पद्धत बदलण्याकडे कंपन्यांचा वाढता कल आहे. यंदाचा सर्वे पाहिला असता कंपन्यांकडून वर्क कल्चरबरोबरच कर्मचा-यांना प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रमाण वाढले आहे. हल्ली कर्मचा-यांना देणा-या वेतनाव्यतिरिक्त अन्य बाबींकडे कंपन्या लक्ष देत आहेत, असे रँडस्टँड इंडियाचे सीईओ मूर्ती उपलौरी यांनी स्पष्ट केले. या सर्वेमध्ये दीडशे कंपन्या आणि ८,५६० कर्मचा-यांनी सहभाग घेतला होता. एकूण कर्मचा-यांपैकी ४२ टक्के कर्मचा-यांनी चांगले वर्क कल्चर या घटकाला अधिक महत्त्व दिले आहे.

बहुतांश कर्मचा-यांनी वेतन आणि कंपनीकडून मिळणा-या सोयी-सुविधांना अ​धिक प्राधान्य दिले आहे तर निम्याहून अधिक कर्मचा-यांनी दीर्घकालीन नोकरीला प्राधान्य दिले आहे. गेली अनेक वर्षे सर्वोेत्तम कंपनीचा बहुमान मिळविणा-या मायक्रोसॉफ्टने यंदा ‘हॉल ऑफ फेम’ या गटात स्थान प्राप्त केले आहे.

Leave a Comment