भारताकडून परदेशातील सर्वात मोठ्या महोत्सवाचे आयोजन

nile
कैरो – भारतीय पर्यटकांसाठी इजिप्त हा देश सुरक्षित असून भारताकडून हा संदेश देण्यासाठी इजिप्तमध्ये नाईलसाठी भारत (इंडिया बाय द नाईल) हा परदेशातील सर्वात मोठा महोत्सव आयोजित करणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांना संदेश दिला जाईल की, दहशतवादी हल्ले तसेच अशांततेपासून या देशात पर्यटकांना कोणताही धोका नाही. आजपासून सुरू झालेला हा महोत्सव १७ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या महोत्सवाचे प्रमुख पाहूणे महानायक अमिताभ बच्चन असणार आहेत

भारताचे इजिप्तमधील राजदूत नवदीप सुरी यांनी सांगितले की, इजिप्तच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाने कोणतेही आढेवेढ न घेता भारताच्या या प्रस्तावास मंजुरी दिली. १८ दिवस चालणाऱ्या या महोत्सवामुळे इजिप्तचे मंत्रालय प्रभावित झाले आहे.

Leave a Comment