अवकाशात चीनचा महाकाय सौर उर्जा प्रकल्प

solar
पेचिंग – चीनने जमिनीच्या वर ३६ हजार किलोमीटर अंतरावर अंतराळात महाकाय सौर उर्जा पॅनल बसविण्याची योजना आखली आहे. यामुळे देशातील ग्रीनहाऊस समस्या कमी होणार आहेच पण देशाचे उर्जा संकटही संपुष्टात येणार आहे. विशेष म्हणजे ही योजना एका विज्ञान कथेचा आधार घेऊन बनविली गेली आहे.

विज्ञानकथा लेखक आयजॅक असिमोव्ह यांनी १९४१ साली लिहिलेल्या रीजन या कथेवर आधारित आहे.त्यात अंतराळातील संयंत्र सूक्ष्म तरंग पृथ्वीवर रिसेप्टरकडे पाठवितात असा उल्लेख आहे. चीनच्या अंतराळ प्रौद्योगिक संस्थेत ५० वर्षे कार्यरत असलेले ९३ वर्षीय वांग शी यांनी अंतराळातील सौर उर्जा प्रकल्पाची योजना मांडली असून ते म्हणाले की आयजॅक असिमोव्ह याच्या कथेला विज्ञानाचा आधार आहे. अंतराळातील ही सौर पॅनल ५ ते ६ चौरस किलोमीटर परिसरारत बसविली जातील म्हणजे त्यांचा आकार जगातील सर्वात मोठा अशा चीनच्या तियानमेन चौकाच्या १२ पट असेल. ही पॅनल रात्री एखाद्या तार्‍याप्रमाणे चमकताना दिसतील.

या पॅनलमधून वीज मायक्रोवेव्ह आणि लेझरच्या स्वरूपात येईल आणि ती परावर्तित करून पृथ्वीवरच्या रिसेप्टरमध्ये साठविली जाईल. ही योजना प्रत्यक्षात आली तर ती अपोलो यान व आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रापेक्षाही मोठी होईल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment