सोयुझ यान पोहोचले अवकाशात

space
वॉशिंग्टन : तीन अवकाशवीरांना घेऊन आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर रशियाचे सोयुझ हे अवकाशयान पोहोचले. रशियाचा अवकाशवीर मिखाईल कोर्निएंको, अमेरिकी अवकाशवीर स्कॉट केली हे दोघे अवकाश स्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत ३४२ दिवस राहणार आहेत. मानवी शरीरावर वजनविरहित अवस्थेत होणा-या परिणामांचा अभ्यास हे दोघे करणार असल्याची माहिती अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधक संस्थेने दिली आहे. या अभ्यासाचा उपयोग भविष्यात मंगळ आणि त्या पलीकडच्या दीर्घ कालावधीच्या अवकाश मोहिमांसाठी होणार आहे. सोयुझ अवकाशयानात रशियाचा अवकाशवीर जेनेडी पाडाल्का हा असून तो अवकाश स्थानकावर सहा महिने राहणार आहे. या मोहिमेत दोन अवकाशवीर सर्वाधिक काळ अवकाश स्थानकात राहण्याचा विक्रम करणार आहेत. मिखाईल आणि केली यांनी याआधी सहा महिने अवकाश स्थानकात वास्तव्य केले आहे.

Leave a Comment