पुणे विद्यापीठाला मिळणार दहा कोटींचा निधी

pune-university
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे उद्योजक निर्मितीला चालना मिळावी आणि तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने डिझाईन इनोव्हेशन सेंटर स्थापन केले जाणार असून याबाबतच्या प्रस्तावास नुकतीच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. शेतकरी व समाजाला उपयोगी पडणाऱ्या पुरक गोष्टींचे ज्ञान या सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.

दोन दिवसांपूर्वीचा या डिझाईन इनोव्हेशन सेंटरबाबत सादरीकरण एमएचआरडीच्या समितीसमोर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड आणि रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. डी. ढवळे यांनी केले. विद्यापीठाने मांडलेल्या इनोव्हेटीव्ह कल्पना पाहून एमएचआरडीने या प्रकल्पास तत्काळ मान्यता दिली. त्यामुळे विद्यापीठाला तब्बल १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

Leave a Comment