प्राध्यापक होण्यासाठी नेट, सेट उत्तीर्ण किमान पात्रता

supreme-court
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयानुसार जर तुम्ही एनईटी (नेट) किंवा एसएलईटी परीक्षा उत्तीर्ण केली असेल तरच तुम्ही लेक्चरर अर्थात प्राध्यापक होण्यासाठी पात्र आहात.

न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्यांच्याकडे एम. फिल. व पीएच. डी. पदवी आहे ते लेक्चरर होण्यासाठी पात्र नाहीत. न्या. टी. एस. ठाकूर आणि न्या. आर. एफ. नरिमन यांचा समावेश असलेल्या न्यायासनाने एम. फिल. व पीएच. डी. पदवीधारकांनी दाखल केलेल्या याचिका खारिज करताना हा निर्णय दिला आहे. हा नियम पक्षपात करणारा आणि आमच्या समानतेच्या अधिकाराचे हनन करणारा आहे, असा याचिकाकत्र्यांचा दावा होता. विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) नियम हे केंद्र सरकारच्या धोरणाला अनुरूपच असले पाहिजे. केंद्र सरकारने नियुक्तीचे उच्च मापदंड कायम ठेवण्यासाठी लेक्चरर व सहायक प्रोफेसर या पदासाठी राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) उत्तीर्ण करणे, ही किमान पात्रता निश्चित करण्यात आली.

Leave a Comment