पुढील वर्षी सुखावेल शेतकरी !

farmer
नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत आहे. गेल्या वर्षी तर पाऊसच झाला नसल्यामुळे आज अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु यंदा चांगला मान्सून अपेक्षित आहे. तज्ज्ञांनीही तसा अंदाज वर्तविल्याने पुढील वर्षी शेतकरी सुखावेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला फार मोठा हातभार लागेल. १२० हजार अब्ज रुपयांच्या भारतीय अर्थव्यवस्थेत केवळ कृषि क्षेत्राचा १४ टक्के वाटा आहे.

खरे तर बहुतांशी भारतीय शेती पावसावर अवलंबून आहे. त्यातच सातत्याने पाऊस हुलकावणी देत असल्याने शेती क्षेत्राची फार मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यातच सिंचनाच्या सोयीही फार कमी आहेत. त्याचा फटका शेती उत्पादनाला बसत आहे. त्यातच यंदा चांगला पाऊस झाल्यास रिझव्र्ह बँक पुन्हा व्याजदर कपातीवर विचार करू शकते. आंध्र प्रदेशचे जीव्हीके पॉवर अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि.चे मुख्य अर्थ अधिकारी आयजॅक जॉर्ज यांनी महागाई नियंत्रणात राहिली आणि चांगला पाऊस झाला, तर व्याजदरात आणखी कपात होऊ शकते.

मागील आठवड्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पात आर्थिक विकासासंबंधीचा आराखडा सादर केला. यातूनच व्याजदर कपातीला मदत झाली. भविष्यातही याचा लाभ होऊ शकतो.

Leave a Comment