सेरीस या ग्रहावर दुसरा ठळक प्रकाश ठिपका

nasa
वॉशिंग्टन : सेरीस या बटू ग्रहावर दुसरा ठळक प्रकाश ठिपका नासाच्या वैज्ञानिकांना दिसल्यामुळे ते गोंधळात पडले आहेत. दरम्यान याच वेळी अमेरिकेचे डॉन हे अवकाशयान लघुग्रह पटट्यात प्रवेश करून या ग्रहाच्या कक्षेत जाणार आहे, त्यामुळे हे ठळक प्रकाशीय भागाचे गूढ उलगडणार आहे. सेरीसपासून ४६,००० किलोमीटर अंतरावरून घेतलेल्या छायाचित्रात प्रकाशीय ठिपका दिसत असून असाच पण काळसर ठिपका सापडला होता, असे नासाने म्हटले आहे.या ग्रहाच्या छायाचित्रांचा विचार करता प्रकाशीय ठिपका नवीन असून तो त्या ग्रहावरील ज्वालामुखीला सूचित करीत असावा पण अजून ठळक प्रतिमांची आम्ही वाट पाहात आहोत. त्यानंतरच त्याची भूभौतिक कारणे स्पष्ट होतील, असे डॉन मोहिमेचे ख्रिस रसेल यांनी सांगितले.

६ मार्चला डॉन अवकाशयान सेरीसच्या कक्षेत जात असून त्याची अधिक ठळक छायाचित्रे मिळविली जातील. आताचा प्रकाशीय ठिपका खूप लहान असून तो टिपणे अवघड आहे. सेरीसवरचा ठिपका इतर ठिपक्यांपेक्षा जास्त प्रकाशमान आहे, असे वैज्ञानिक अँडिड्ढयस मॅथ्यूज यांनी सांगितले. २०१२ मध्ये नासाला सेरीसवरून पाण्याच्या वाफा बाहेर पडताना दिसल्या होत्या. त्यामुळे तेथील पाण्यात खनिजे असावीत, असा निष्कर्ष काढण्यात आला होता.

Leave a Comment