मुख्यमंत्र्यांची घोषणा; राज्यात स्वाईन फ्लूवरील उपचार मोफत

fadnvis
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील स्वाईन फ्लू रुग्णांवरील उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.

स्वाईन फ्लूचा कहर देशासह राज्यभरात वाढत आहे. रविवारी एकाच दिवसात राज्यभरात १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या १४३ वर पोहोचली आहे. रुग्णांची ही वाढती संख्या लक्षात घेत, मुख्यमंत्र्यांनी सर्व रुग्णालयांना स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले. तसंच स्वाईन फ्लू रोखण्यासाठी आणि रुग्णांना तातडीने उपचार मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. याचाच एक भाग म्हणून मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्याचबरोबर अवकाळी आलेल्या पावसामुळे स्वाईन फ्लू फैलावण्याची शक्यता वाढली आहे. मात्र जोपर्यंत राज्यातली स्वाईन फ्लूची स्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत रुग्णालयातील डॉक्टर्स आणि स्टाफच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment