भन्नाट फीचर्ससह आले ‘गॅलेक्सी एस ६’ आणि ‘गॅलेक्सी एस ६ एज’

samsung
मुंबई: आपले अत्याधुनीक स्मार्टफोन्स कोरियन कंपनी सॅमसंगने ‘गॅलेक्सी एस ६’ आणि ‘गॅलेक्सी एस ६ एज’ हे स्मार्टफोन भन्नाट फीचर्ससह लाँच केले आहेत.

अत्याधुनिक फीचर्सची सॅमसंगने या फोनमध्ये निवड केली असून केवळ दहा मिनिटात हे फोन चार्ज होतील आणि तब्बल दहा तासांपर्यंत चालू शकतील, असा दावा सॅमसंगने केला आहे. तसेच यामध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधाही आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस अर्थात एमडब्लूसीमध्ये सॅमसंगने हे फोन लाँच केले. हे दोन्ही स्मार्टफोन मेटल फ्रेम आणि ग्लास बॉडीचे आहेत. जगभरात लवकरच याची विक्री सुरु होणार आहे. या दोन्ही फोन्सची विक्री लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे विक्रीला उपलब्ध झाल्यानंतरच या फोन्सची किंमत कळू शकेल.

काय खास फीचर्स आहेत गॅलेक्सी एस ६मध्ये
सॅमसंगच्या आतापर्यंतच्या सर्वात स्लिम स्मार्टफोन्सपैकी ‘गॅलेक्सी एस ६’ हा एक आहे.
५.१ इंच HD सुपर अमोलेड डिस्प्ले, स्क्रीन रेझ्युलेशन २५६०x१४४०, जाडी – ६.८MM, बॅटरी – वेगवान चार्जिंग तंत्रज्ञानासह २५५० MAh,
काय खास फीचर्स आहेत गॅलेक्सी एस ६ एजमध्ये
५.१ इंच HD सुपर अमोलेड डिस्प्ले, डिस्प्ले – दोन्ही बाजूला डिस्प्ले स्क्रीन, स्क्रीन कार्निग गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेश्कनलेस, वेगवान चार्जिंग तंत्रज्ञानासह बॅटरी २६०० MAh
या दोन्ही फोनमधील अन्य फीचर्स सारखेच आहेत. दोन्ही स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड ५.० ऑपरेटिंग सिस्टिम आहे.
७ GHZचा प्रोसेसर, ३ GB रॅम, ३२,६४ आणि १२८ GB स्टोरेजचे पर्याय, कॅमेरा १६ मेगापिक्सल, फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल, ४G, ब्लू टूथ ४.१

Leave a Comment