फेसबुकने सुरु केला नवा जेंडर ऑप्शन

facebook
वॉशिंग्टन : स्त्री आणि पुरुषांशिवाय एक नवा जेंडर ऑप्शन फेसबुकने सुरु केला असून यामध्ये कोणताही फेसबुक युजर स्वत:ची जेंडर ओळख देताना नाराज होणार नाही. फेसबुकच्या जेंडरसाठीच्या फीचरमध्ये आतापर्यंत ५८ ऑप्शन होते. नव्या जेंडर ऑप्शनमुळे ही संख्या आता ५९ वर गेली आहे.
फेसबुकने एक रिकामी जागा जेंडरच्या लिस्टमध्ये सोडली असून जर फेसबुक युजर्सना आधीच्या ५८ जेंडर लिस्टव्यतिरिक्त कोणता जेंडर टाइप करायचा असेल, तर त्या रिकाम्या जागेत टाइप करता येणार आहे.

जे स्वत:ला पुरुष आणि स्त्रीही मानतात अशा युजर्ससाठी हे नवे फीचर आहे . फेसबुकने जेंडर सिलेक्शनच्या या फीचरमध्ये पहिल्यांदाच बदल केलेला नाही. फेसबुकने गेल्या वर्षी म्हणजे २०१४ साली स्त्री-पुरुषांऐवजी एंड्रोजायन, जेंडर फ्ल्यूड, इंटरसेक्स इत्यादी अनेक ऑप्शन्स अॅड केले होते.

जेंडर ऑप्शनसमोर रिकामी जागा ठेवण्याचा निर्णय फेसबुक कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या अडचणीवरुन घेतला गेला. फेसबुकचे सॉफ्टवेअर इंजिनिअर एरी चिवुकुला ट्रान्सजेंडर आहेत. एरी यांना फेसबुकचा फॉर्म भरताना जेंडर ओळख देताना अडचण आली. त्यामुळे फेसबुकने हा नवा ऑप्शन अॅड केला आहे. ज्यामुळे स्वत:ला पुरुष आणि स्त्री यांपैकी कुणीही न मानणाऱ्यांसाठी फेसबुकची ही नवी अॅडीशन महत्वाची ठरली आहे. शिवाय फेसबुकच्या या स्वागतार्ह निर्णयामुळे अशा लोकांना वेगळी ओळखही मिळेल, अशी आशा फेसबुककडून व्यक्त केली गेली आहे.

Leave a Comment