धोक्याची घंटा; वाढला स्वाईन फ्लूचा धोका

swine-flu
नवी दिल्ली : रविवारी पावसाची जोरदार उपस्थिती महाराष्ट्रासह दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर अशा देशातील अनेक भागांमध्ये जाणवली. महाराष्ट्रात तर जवळपास संपूर्ण राज्यात पाऊस कोसळत असून हा पाऊस जर आणखी काही दिवस सुरुच राहिला तर देशभरात स्वाईन फ्लूच्या धोक्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार भारताव्यतिरिक्त पाकिस्तानच्या काही भागांमध्येही पाऊस पडल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळेच डोंगराळ भागात थंडी वाढण्याची चिन्हे आहेत. पावसाबरोबरच उत्तर मध्य भारतात हवेचा वेग वाढलेला असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आणि उत्तरप्रदेशवर या वा-यांचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. दिल्लीत सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार या भागांमध्ये आगामी आठवडाभरही पाऊस होण्याची शक्यता आहे. याठिकाणी ५० ते १०० मि.मि. पाऊस होण्याची शक्यता आहे.

उत्तर आणि मध्य भारतात पाऊस होण्याची शक्यता असल्याने आगामी काळात स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढण्याची शक्यता वर्तिवण्यात आली आहे. पश्चिमी वा-यांमुळे पाऊस आणि चक्रीवादळाचा तडाखा कायम राहण्याची शक्यता आहे. आठवडाभर असेच हवामान राहिले तर स्वाईन फ्ल्यूचा धोका आणखी वाढण्याची शक्यचा निर्माण झाली आहे. थंड वातावरणामध्ये एच१ एन१ ची लागण अत्यंत वेगाने होत असते. कमी तापमान आणि मोठ्या प्रमाणावर आद्र्रता असल्याने याचा फैलाव अधिक होतो. तापमान वाढल्यानंतर स्वाइन फ्लुचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण पावसामुळे आद्र्रता वाढल्याने ही स्थिती पूर्णपणे उलटी होणार असून धोका अधिक वाढणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment