दुबईत बनतेय अल्लादिन नगरी

aladdin
दुबईत सतत कांही ना कांही नवीन उभारणी सुरूच आहे. त्यासाठी अफाट पैसा पुरविण्याची तयारीही दाखविली जात आहे. यामुळेच आता जगातील सर्वाधिक उंच इमारत बुर्ज खलिफाच्या जवळच खाडीत अल्लादिन सिटीची उभारणी सुरू करण्यात येत आहे. ही नगरी म्हणजे स्वप्नातली दुनियाच असेल असे या सिटीची उभारणी करणार्‍या कंपनीचे व्यवस्थापकीय महासंचालक हुसेन नासीर यांनी सांगितले. अरेबियन नाईटस आणि आधुनिक डिस्ने ब्लॉकबस्टरवरून प्रेरणा घेऊन ही नगरी वसविली जात आहे.

प्रत्यक्षात अल्लादिन नगरी हे एक हॉटेल आहे.४ हजार एकरात बनणार्‍या या नगरीत एकूण ६ टॉवर्स असून ते एकमेकांशी वॉकवेच्या पुलांनी जोडले जाणार आहेत. त्यातील ३ टॉवर मुख्य आहेत आणि त्यात प्रत्येकी ३४ मजले आहेत. हॉटेल आणि व्यवसायासाठी येथे ९०० कार पार्क उभारली जात आहेत. अल्लादिनच्या कथेत वर्णन केलेल्या जादूच्या दिव्याच्या आकारात हे टॉवर्स बांधले जाणार आहेत. पुढच्या वर्षात या नगरीच्या उभारणीचे काम सुरू होत असून त्याची घोषणा एप्रिलमध्येच केली गेली आहे.

या परिसरात फिरण्यासाठी पारंपारिक लाकडी नावा उपलब्ध केल्या जाणार आहेत तसेच या नगरीची नोंद युनेस्को वल्ड हेरिटेज साईटमध्ये व्हावी यासाठीही खास प्रयत्न केले जाणार आहेत असेही नासीर यांनी सांगितले.

Leave a Comment