गुगलच्या निर्णयाला इंटरनेट युजर्सचा विरोध

google
कॅलिफोर्निया : इंटरनेट युजर्सच्या संघटनेने गुगलने आपल्या ब्लॉगवर अश्लील मजकुराला स्थान देण्यात येणार नसल्याने स्पष्ट केल्यावर अशा प्रकारचे निर्बंध म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे म्हणत विरोध दर्शविला आहे.

गुगलने आपल्या ब्लॉगवर येत्या २३ मार्चपासून अश्लील मजकुराला स्थान देण्यात येणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच २३ मार्चनंतर अशा प्रकारचा मजकूर सार्वजनिक रीत्या प्रकाशित करण्यात येणार नाही तसेच यापूर्वी अशा प्रकारचा प्रकाशित करण्यात आलेला मजकूर केवळ संबंधित युजर पुरताच मर्यादित राहणार आहे. काही प्रकारांमध्ये असा मजकूर काढूनही टाकण्यात येणार आहे तसेच संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही गुगलने दिला आहे. गुगलच्या या निर्णयावर विविध स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. काही ठिकाणी या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे तर काही ठिकाणी विरोध दर्शविण्यात येत आहे. इंटरनेट युजर्स असोसिएशन हा प्रकार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे म्हणत या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच हा प्रकार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सेन्सॉरशिप असल्याचेही असोसिएशनने म्हटले आहे. गुगलच्या या निर्णयामुळे संबंधित युजर वापरत असलेल्या गुगलच्या अन्य सेवांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही गुगलने स्पष्ट केले आहे.

इंटरनेट युजर्स असोसिएशनचे अध्यक्ष व्हिक्टर डोमिंगो यांनी एका स्पॅनिश वृत्तसंस्थेकडे बुधवारी असोसिएशनची भूमिका स्पष्ट केली. गुगलच्या या निर्णयामुळे अनेक ब्लॉगर आपला ब्लॉग बंद करण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment