अ‍ॅपल कंपनीवर पेटंट मोडल्याप्रकरणी ३३०० कोटींचा दंड

apple
टेक्सास : अ‍ॅपल कंपनीला टेक्सासच्या स्मार्टफ्लॅशचे तीन पेटंट मोडल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले असून या कंपनीवर पेटंट मोडल्याप्रकरणी ३३०० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

हे तिन्ही पेटंट आयट्यून्सशी संबंधित असून आयट्यून्समधून डाऊनलोड गेम आणि गाणी साठवण्यासाठी अ‍ॅपल ज्या डेटा मॅनेजमेंट आणि स्टोअरेज टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे ती आपली असल्याचा स्मार्टफ्लॅशचा दावा आहे. अ‍ॅपलने त्यासाठी परवानगी मागितली नाही. स्मार्टफ्लॅश पेटंट लायसन्सिंग कंपनी आहे.

आठ तासांच्या युक्तिवादानंतर अ‍ॅपलने जाणीवपूर्वक ही कृती केल्याचे ज्यूरीने मान्य केले. स्मार्टफ्लॅशने ५,२८२ कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. अ‍ॅपलने दंड भरण्यास नकार दिला असून कंपनी निकालास आव्हान देणार आहे. खटला २०१३ पासून चालू होता. सन २००० च्या आसपास हे तंत्रज्ञान बनवणा-या टीममध्ये कार्यरत पॅटिड्ढक रॅश यांनी ऑगस्टिन फैरुजिमा नावाच्या व्यक्तीला पेटंटबाबत सांगितले होते. यानंतर ऑगस्टिन अ‍ॅपलमध्ये संचालक झाले.

Leave a Comment