अमेरिकेत शिकवणी नसलेली ‘कम्युनिटी महाविद्यालये’

barack
वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेमध्ये विविध पदविका प्रमाणपत्र तसेच दोन वर्षांतपर्यंतचा अभ्यासक्रम असलेली तसेच शिकवणी नसलेली ‘कम्युनिटी महाविद्यालये’ सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ओबामा यांच्या या निर्णयावर अमेरिकेतील शिक्षण क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. एका बाजूला हा निर्णय क्रांतिकारक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना दुसरीकडे या निर्णयामुळे महाविद्यालयात नियमित जाणा-यांसाठी पर्याय उपलब्ध होऊन त्यांना महाविद्यालयात न जाता अभ्यासक्रम पूर्ण करून शिक्षण घेणा-यांची संख्या वाढण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही दशकांपासून विद्याथ्र्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी अनुदानाच्या माध्यमातून तसेच कर्जाच्या माध्यमातून वित्तपुरवठा करण्यात येत आहे. महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी हा एक उत्तम मार्ग होता. मात्र ओबामा यांनी शैक्षणिक धोरणांमध्ये बदल करत उच्च शिक्षण घेऊन इच्छिणा-यांसाठी अत्यल्प दरात महाविद्यालयांमध्ये प्रवेश खुला केला आहे. याबाबत व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या एका ओबामा यांच्या व्हीडीओमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. ओबामा यांच्या या निणर्यावर निधी उभारणे, उच्च शिक्षणातील दर्जा राखणे तसेच नागरिकांचा प्रतिसाद याबाबत शिक्षण क्षेत्रातून याबाबत विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

Leave a Comment