१८ जानेवारीला धावणार मुंबई!

mumbai-marathon
मुंबई – मुंबई मॅरेथॉनच्या १२ व्या पर्वाच्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून रविवार १८ जानेवारी २०१५ रोजी सर्व वर्गवा-यामधील एकूण ४०,४८५ स्पर्धक धावणार आहेत. हाफ मॅरेथॉनसाठी अपेक्षेपेक्षा जास्त नोंदणी झाली. फुल मॅरेथॉन, डीएचएल कॉर्पोरेट चॅपियन्स आणि चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटी या वर्गवा-यामध्ये झालेल्या नोंदण्यांमध्येही वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीपेक्षा मॅरेथॉनसाठी आलेल्या अर्जांची संख्या २० टक्क्यांनी जास्त असल्यामुळे ४२.१९७ किमीचे अंतर असलेल्या फुल मॅरेथॉनमध्ये धावणा-या धावपटूंना वेळ निश्चित करुन त्यामध्ये मॅरेथॉन पूर्ण करण्यास आणि हौशी धावपटूंनाही मॅरेथॉन पूर्ण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी या रनमध्ये सहभागी झालेल्या १५ कॉर्पोरेट चॅम्पियन्सच्या तुलनेत यावर्षी ८१ कॉर्पोरेट चॅपियन्सनी सहभाग नोंदवला आहे. यावर्षी या रनमध्ये स्टँडर्ड चार्टर्ड बँक, टाटा मोटर्स, मॉर्गन स्टॅनली, एलअँडटी टेक्नोलजी सर्व्हिसेस लिमिटेड, इन्फोसिस लिमिटेड, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, डीएचएल एक्स्प्रेस, बँक ऑफ बडोदा अशा आघाडीच्या कॉर्पोरेट्सनी सहभाग घेतला आहे.

Leave a Comment