ओबामांची सुरक्षा भारत सरकारची जबाबदारी

cadilac
दिल्ली – प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा राजपथावर गणतंत्र परेडसाठी येताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी याच्या लिमोसीन गाडीतून येणार आहेत. यावेळी ओबामा त्यांच्या नेहमीच्या बीस्ट या कॅडिलॅक गाडीतून प्रवास करणार नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष परदेशात जाताना त्यांच्याबरोबर असणारी त्यांची सुरक्षा व्यवस्था अमेरिकेकडूनच तैनात केली जात असते. अमेरिकन राष्ट्रपतीनी स्वतःच्या सुरक्षा कारचा प्रवासासाठी वापर न करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ओबामांच्या नियोजित भेटीआधीच अमेरिकेची सुरक्षा टीम भारतात दाखल झाली आहे. ओबामा जेथे जाणार आहेत त्या सर्व जागांची तपासणी त्यांनी केली आहे. मात्र भारताने प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्यांची सुरक्षा ही भारताची जबाबदारी असल्याचे सांगून ओबामांच्या सुरक्षेची सर्व हमी घेतली आहे. व यामुळेच ओबामा राष्ट्रपतींच्या कारमधून राजपथावर येणार आहेत.

पाकिस्तानातील पेशावर येथे शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताही हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीतील सुरक्षा आत्तापासूनच कडक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे प्रमुख भारतात येत आहेत. त्यामुळे कोणताही धोका भारत पत्करणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment