धूम्रपानाचे व्यसन सोडू शकते ‘ई’ सिगरेट

e-cigarate
लंडन – अनेक अशक्यप्राय गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने साध्य झाल्या असून आता तंत्रज्ञानाची मदत मनाशी संबंधित गोष्टींवरही घेण्यात येत आहे आणि आता यातच ‘ई’ सिगरेटची भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या समीक्षेअंतर्गत ही गोष्ट अनुभवास आली आहे की, धूम्रपानाचे व्यसन सोडण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सिगरेट अतिशय उपयुक्त सिद्ध होऊ शकते.

या दरम्यान दोन प्रयोग पहिल्या कोक्रेन समीक्षेअंतर्गत करण्यात आले, ज्यात धूम्रपान करणार्‍या ६६२ जणांची रँडम पद्धतीने निवड करण्यात आली. कोक्रेन पद्धतीअंतर्गत प्राथमिक आरोग्याशी संबंधित मुद्यांची आधी समीक्षा होते आणि याला अतिशय उच्च मानक समजण्यात येते. ‘ई’-सिगरेटशी संबंधित या निष्कर्षांसंबंधी अन्य अध्ययन पद्धतीने विस्तृत माहिती गोळा करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे ब्रिटन आणि न्यूझीलंडच्या संशोधकांनी म्हटले आहे.

Leave a Comment