गुगल कारच्या नवीन अॅड्राईड व्हर्जनवर काम सुरू

google
गुगलने त्यांच्या स्मार्टकारसाठी अँड्राईड एम नावाचे नवे व्हर्जन विकसित करण्याच्या कामास सुरवात केली असल्याचे वृत्त रॉयटरने दिले आहे. हे नवे व्हर्जन तत्कालीन कार सिस्टीम अँड्राईड ऑटोपेक्षा वेगळे असून ते स्मार्ट कार क्षेत्रात क्रांती घडवेल असे सांगितले जात आहे.

नवीन व्हर्जननुसार तयार केले जात असलेले अँड्राईड एम स्मार्टफोनला कनेक्ट रून इंटरनेटशी जोडले जाण्याची गरज राहणार नाही. कारण ते कारमध्ये लोड केल्यावर त्याची ऑपरेटिंग सिस्टीम सरळ कार सिस्टीम अॅक्सेस करू शकणार आहे. त्याचे सेन्सर, कॅमेरे, व बाकी सर्व फिचर्स थेट कंट्रोल करता येणार आहेत. अर्थात ही नवी सिस्टीम बाजारात येण्यास आणखी १ वर्ष प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Leave a Comment