ब्लॅकबेरी क्लासिक लाँच

blackberry
ब्लॅकबेरीने पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॅकबेरी क्लासिक स्मार्टफोनच्या लॉचिंगने बाजारात पुनरागमन केले असून या फोनची प्री ऑर्डर किंमत आहे ४४९ डॉलर्स म्हणजे साधारण २८५०० रूपये. अर्थात हा फोन सध्या कॅनडा आणि अमेरिकेत लाँच केला गेला असून भारतात तो कधी उपलब्ध होणार याची माहिती अद्यापी जाहीर करण्यात आलेली नाही.

आपल्या पूर्वीच्या स्मार्टफोनप्रमाणेच याही फोनचे डिझाईन ब्लॅकबेरीने केले आहे. या फोनला टच एंड टाईप फिचर, ब्लॅकबेरी ऑपरेटिंग सिस्टीम, १६ जीबीची मेमरी व कार्डच्या सहाय्याने ती १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली असून वेगवान इंटरनेटही त्याला मिळणार आहे. ३.५ इंचाचा टचस्क्रीन, अॅप लायब्ररी, अमेजॉन डॉट कॉमच्या अँड्राईड अॅप स्टो्रअर्सची थेट अॅक्सेस करण्याची सुविधा, ८ एमपीचा कॅमेरा एलईडी फ्लॅशसह, व्हिडीओ कॉलींग, सेल्फीसाठी ५ एमपीचा कॅमेरा अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.

Leave a Comment