अमेरिकेतही उबेर टॅक्सीत महिलेवर बलात्कार

uber
दिल्ली- भारतात उबेर टॅक्सीत चालकाने महिला प्रवाशावर बलात्कार केल्याची घटना चर्चेत असतानाच अमेरिकेतही ६ डिसेंबरलाच उबेर टॅक्सीचालकाने महिला प्रवाशावर बलात्कार करून तिचे अपहररण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या टॅकसीचालकाचे नाव अलेक्झांड्रो असे असून त्याला बोस्टन पोलिसांनी अटक केली आहे. त्याला केंब्रिज कोर्टासमोर हजरही केले गेले आहे.

या संदर्भात उबेरच्या प्रवक्त्या कॅटलीन डुरकोश यांनी टॅक्सीचालकाची सर्व पार्श्वभूमी नोकरीवर ठेवण्यापूर्व तपासली गेली होती असे सांगितले आहे. मात्र तरीही पोलिसांना तपासात कांहीही आवश्यक ते सहाय्य करण्याची तयारी दाखविली आहे. दिल्लीतील घटनेनंतर केंद्र सरकारने उबेर टॅक्सी सेवेवर दिल्लीत बंदी घातली असून सर्व राज्यांनाही या टॅक्सीसेवेवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.

Leave a Comment