आता कनिष्ठ महाविद्यालयात संस्कृत भाषा ‘अनिवार्य’

smriti-irani
दिल्ली : केंद्रीय विद्यालय संघटनेने महाविद्यालयात संस्कृत भाषा ‘अनिवार्य’ केल्यानंतर आता कनिष्ठ महाविद्यालयातही संस्कृत अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

कनिष्ठ महाविद्यालयात पर्यायी विषयांमध्ये संस्कृतवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे केंद्राने सर्व कनिष्ठ विद्यालयात संस्कृत शिकवण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचे पत्राद्वारे सांगितले आहे. विषय ठरवताना संस्कृत या भाषेविषयी योग्य ते पालन न केल्याने १९८० पासून संस्कृत शिक्षकांची नियुक्ती करणे थांबले होते. मात्र, आता घेण्यात आलेल्या निर्णयामुळे संस्कृत शिक्षकांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात येणार आहे.

Leave a Comment