सिंगापूर हॉटेलातून उडणारे रोबो देणार सेवा

singapore
सिंगापूर – पुढच्या वर्षात सिंगापूरला जायच्या विचारात असाल तर तुमचे हॉटेलात स्वागत करण्यासाठी कदाचित माणसांच्या ऐवजी रोबोच पाहायला मिळतील याची तयारी ठेवा. कारण या वर्षअखेर येथील कांही हॉटेलातून इनफिनियम रोबोटिक्सने तयार केलेले उडते रोबो ग्राहकांना खाद्यपदार्थ आणि पेये पुरविणार आहेत. रोबोच्या व्यावसायिक वापराचा हा जगातला पहिला प्रयोग असल्याचा दावा केला जात आहे. तसेच सिंगापूरमध्ये असलेल्या कामगार टंचाईवरही त्यामुळे मात करता येणे शक्य होणार आहे.

इनफिमियम रोबोटिक्सचे सीईओ या संदर्भात माहिती देताना म्हणाले की हे फ्लाईंग रोबो सिंगापूरच्या टिब्रे ग्रुपच्या पाच पैकी कांही रेस्टॉरंटमध्ये तैनात करण्यात येत आहेत. त्यासंदर्भातला करार टिब्रे ग्रुपबरोबर झाला आहे. या प्रयोगासाठी दोन्ही कंपन्या सरकारी अनुदानाची अपेक्षा करत आहेत. या रोबोंचे प्रात्यक्षिक नॅशनल प्रॉडक्टीव्हीटी मंथ आक्टोबरमध्ये सिगापूरचे पंतप्रधान ली हेसलूंग यांना दाखविण्यात आले आहे.

हे फ्लाईंग रोबो हॉटेलातील ग्राहकांना खाद्य पेये त्यांच्या ऑर्डरप्रमाणे पुरवतील व त्यामुळे तेथील कामगार ग्राहकांचा प्रतिसाद या सारखी अन्य महत्त्वाची कामे करण्यासाठी मोकळे राहतील असेही कंपनीचे म्हणणे आहे.

Leave a Comment