उद्यापासून खरेदी करता येईल ‘ल्युमिया ५३५’

lumia-535
मुंबई – मायक्रोसॉफ्ट डिवाइसने जागतिक स्तरावर सादर केलेला ‘मायक्रोसॉफ्ट ल्युमिया ५३५’ हा डयुअल सिम फोन डेनिम अपडेटसह भारतात आणला असून ९,१९९ रुपये किंमत असलेला हा फोन देशभरातील विविध स्टोअरमध्ये शुक्रवारी म्हणजेच उद्यापासून खरेदी करता येणार आहे.

हा फोन सादर करतानाच मायक्रोसॉफ्टच्या ब्रँडखाली असलेला इतर फोनवरील नोकियाचे नाव पुसले जाणार नसल्याचे सांगत या फोनना पूर्वीप्रमाणेच सेवा आणि अपडेट दिले जाणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले.

विंडो फोन ८.१ या नव्या ऑपरेटिंग सिस्टीमवरील पाच इंची स्क्रीन असलेल्या या फोनमध्ये वाइड अँगल असलेला ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा ‘सेल्फी’ पिढीला विशेष भावेल असा विश्वास नोकिया इंडिया सेल्सचे संचालक (विपणन) रघुवेश सरूप यांनी व्यक्त केला. महागडे आणि परवडणा-या फोनमध्ये सर्व वैशिष्टये देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment