भारतात दाखल झाला शाओमीचा ‘रेडमी नोट’

redmi
नवी दिल्ली- भारतात चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनीच्या ‘एमआय ३’ आणि ‘रेडमी १एस’ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता ‘रेडमी नोट’ या फॅब्लेटच्या लाँचिंगची घोषणा केली. दोन प्रकारात हा फोन आणला असून यात एक फोर-जी फोन असून सिंगल सिमची सुविधा आहे. तर दुसरा फोन थ्री-जी फोन असून त्यात डय़ुअल सिम आहे. या फोनची किंमत अनुक्रमे ९,९९९ रुपये आणि ८,९९९ रुपये एवढी आहे.

एअरटेलच्या भागीदारीत फोरजी फोन हा लाँच करण्यात आला असून हा फोन ग्राहक एअरटेलच्या वेबसाइटवरही बुक करू शकतात आणि या कंपनीच्या दिल्ली, मुंबई, बंगलोर, कोलकाता, हैदराबाद आणि चेन्नईमधील१०० स्टोअरमध्ये खरेदी करता येणार आहे. याबरोबरच ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवरही हा फोन मिळणार आहे.

थ्रीजी रेडमी नोटसाठी आज सकाळी ६ वाजल्यापासून बुकिंग सुरू झाली असून २ डिसेंबरला या फोनची विक्री होणार आहे. तर फोरजी फोन डिसेंबरअखेरीस उपलब्ध होईल. रेडमी नोटच्या फोरजी प्रकारात १.६ गिगाहर्ट्झ क्वाडकोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि फोरजीमधील टीडीडी आणि एफडीडी सेवेला सपोर्ट करणारा हा फोन आहे.

Leave a Comment