आसुसचा हा स्मार्टफोन ताबडतोब बनतो टॅबलेट

asus
नवी दिल्ली : जेन्फोन सिरीजच्या सफलतेनंतर भारतात ‘आसूस’ या मोबाईल हँडसेट निर्मिती करणा-या कंपनीने एक अनोखा फोन लाँच केला आहे. हा फोन टॅबलेट प्रमाणे देखील वापरता येणार आहे. ‘आसूस’ने ‘पॅडफोन मिनी’ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची किंमत १५,९९९ रूपये आहे.

या फोनचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे टॅबलेट ब्लॉकमध्ये टाकल्यानंतर तो आपोआप ७ इंचच्या टॅबलेटमध्ये परावर्तीत होतो. या फोनचा आयपी ४ इंच असून, स्क्रीन रिझोल्यूशन १२८०-८०० पिक्सल आहे. यामध्ये एक हार्डवेअर असून, टॅबचा वापर करण्यापूर्वी ते फोनमध्ये बसवावे लागते. जेली बीन या जुन्याच ऑपरेटींग सिस्टिमवर हा फोन आधारीत आहे. डयुअल सिमच्या या फोनमध्ये थ्रीजी सपोर्ट आहे. यामध्ये ८ मेगापिक्सल रियर आणि १.९ मेगापिक्सल प्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनसाठी १२०० एमएएमच आणि पॅडसाठी २१०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय १ जीबी रॅम, ८ जीबी स्टोअरेज क्षमता, ६४ जीबीचा मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, थ्रीजी, वायफाय, जीपीएस, ब्लूटयूथ या सुविधा देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment