स्पेस सेंटरकडे झेपावणा-या यानाचा स्फोट

nasa
नवी दिल्ली – अमेरिकेच्या अंतराळ मोहिमेला मोठा धक्का बसला असून स्पेस सेंटरकडे झेपावताना नासाच्या यानाचा स्फोट झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी नासाच्या व्हर्जिना येथील प्रक्षेपण स्थळावर घडली, असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

एक कार्गोशिप घेऊन नासाचे हे यान अंतराळात जात होते. मात्र अंतराळत झेपावल्यानंतर काही वेळातच यानाचा स्फोट झाला. या अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नसून हे यान मानवविरहीत असल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मोठयाप्रमाणात वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Comment