फेसबुकचे नवे चॅटींग अॅप लाँच

room
नवी दिल्ली – आपल्या युजर्ससाठी फेसबुकने ‘रूम्स’ नावाचे एक नवे चॅटींग अॅप्लीकेशन लाँच केले असून या अॅप्लीकेशनमुळे फेसबुक उपभोगत्यांना चॅटींगसाठी आणखी स्वांतत्र्य मिळणार आहे. या अॅपचा फेसबुक अॅप्लीकेशन किंवा मॅसेंजरशी कसलाही संबंध नाही.

हे नवे रूम्स अॅप खास त्या लोकांसाठी आहे जे चॅटींगसाठी याहूचे चॅट रूम वापरतात. त्यामुळे फेसबुकने याहूच्या चॅट रूमप्रमाणेच आपले रूम्स हे अॅप डेव्हलप केले आहे.

या अॅप्लीकेशनचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे, या अॅपसाठी आपल्याला आपले स्वत:च नाव सांगण्याची गरज नसणार आहे. या अॅपच्या माध्यमातून आपण दुसऱ्या नावानेही चॅट करू शकतो. तसेच यामध्ये तुम्ही ज्याच्याशी चॅट करत आहात तो तुमच्या फेंड्सलिस्टमध्ये अॅड असणे गरजेचे नाही. तसेच ज्यांना चॅटमध्ये घ्यायचे नसेल त्यांना तुम्ही रिजेक्ट करू शकता. या चॅट रूममध्ये फोटो, व्हिडीओ आणि टेक्स्ट मॅसेजही पाठवू शकता.

Leave a Comment