सिम कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य

aadhar-card
नवी दिल्ली – आता मोबाइलच्या सिमकार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा विचार केंद्र सरकार करत असून यामुळे मोबाइल फोनचा होणारा दुरुपयोग टाळता येणार आहे.

सध्या मोबाइल सिमकार्ड पत्त्याचा पुरावा आणि ओळखपत्राचा पुरावा दिल्यास सहज मिळते. मोबाइल कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम देऊ करतात त्यामुळे मोबाइलचा गैरवापर वाढला आहे. याचा फायदा दहशतवादी आणि खंडणीखोर यांना होता असल्यामुळे आधार कार्डच्या पुराव्यावरच सिमकार्ड देण्याचे ठरवले आहे.

केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. यात नवीन मोबाइल धारकांबरोबरच जुन्या मोबाइल धारकांनाही आधार कार्ड सक्तीचे करण्याचा विचार करण्यात आला. हा नियम अस्तित्वात आल्यास अनेक गैरव्यवहारांना आळा बसू शकेल. मात्र, देशातील कोटय़वधी नागरिकांना अजूनही आधार कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे सिमकार्डला आधार कार्डची जोड देण्याच्या योजनेला खीळ बसू शकते, यावरही चर्चा झाली.

Leave a Comment