सोने तस्कर ना घर के ना घाट के

gold
मुंबई – सोने गुंतवणूकदारांची सोन्याने निराशा केली असतानाच सोन्याची तस्करी करणार्‍या स्मगलर वरही ना घरका ना घाट का अशी वेळ आल्याचे कस्टम अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. सोने तस्करी हा न परवडणारा व्यवसाय झाला आहे कारण त्यात धोका जास्त आणि कमाई कमी अशी परिस्थिती आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गतवर्षी सोने आयात करात वाढ झाल्याने सोन्याच्या स्मगलिंगमध्ये चांगलीच वाढ झाली होती. सरकारने अनेक उपाय योजना करूनही हे स्मगलिंग सुरूच होते. आजही ते सुरू आहे मात्र सरकारने कारवाई अधिक कडक केली आहे त्याचबरोबर सोने आणण्यासाठी कुरिअर म्हणून काम करणारे लोक अधिक पैसे मागू लागले आहेत. त्यातच आंतरराष्ट्रीय आणि देशी बाजारात सोन्यांच्या किंमतीत फारसा फरक राहिलेला नाही त्यामुळे स्मगलरांचा या व्यवसायातील नफा खूपच घटला आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नियुक्त असलेले कस्टमचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद लांजेवार म्हणाले वास्तविक सोने तस्करी हा चांगलाच फायद्याचा व्यापार झाला होता. मात्र एप्रिल ते सप्टेंबर या काळात फक्त मुंबई विमानतळावर ६०४ किलो सोने जप्त केले गेले आहे. गतवर्षी याच काळात हे प्रमाण ७० किलो होते. सोने तस्करीसाठी कुरियर म्हणून काम करणारे आता १० ग्रॅममागे २८७ रूपये मागतात. आत्तापर्यंत हा दर १५० रूपये होता. त्यामुळे आणलेले सोने पकडले गेले नाही तर त्याची प्रत्यक्षात किंमत किलोला ४० हजार डॉलर्स पडते आणि त्यातून केवळ ४७० डॉलर्स नफा स्मगलरांना मिळतो आहे.

Leave a Comment