सियाचीन भागात २१ वर्षानंतर सापडला जवानाचा मृतदेह

soldier
नवी दिल्ली – जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन भागात भारतीय सैन्य पहारा देत असता त्यांना एका भारतीय लष्करी जवानाचा मृतदेह सापडला. तपासणी केल्यानंतर असे निदर्शनास आले की, ते मृतदेह २१ वषार्पूर्वी बेपत्ता झालेल्या लष्करी हवालदार तुकाराम पाटील यांचे आहे. पाटील १९९३ मध्ये हिमदरीत पडले होते. त्यावेळी त्यांचे वय ३० वर्ष होते. ते महाराष्ट्रात राहणारे होते. परिसरातील तापमान शून्याहून कमी असल्याने पार्थीव सुस्थितीत होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या खिशात असलेल्या पत्राने आणि वैद्यकीय प्रमाणपत्रामुळे त्यांची ओळख पटली आहे. हेलिकॅप्टरमधून वाटण्यात येणारे फूड पॅकेट गोळा करत असता पाटील यांचा रस्ता भरकटला आणि ते हिमदरीत पडले. पाटील यांचे बंधूही लष्करात होते. ते मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये हवालदार होते. ते देखील सियाचीनमध्ये तैनात असता एका हिमस्खलनात मारले गेले. १९८७ मध्ये झालेल्या या दुर्घटनेला २७ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र त्यांचा मृतदेह अजूनही सापडलेले नाही.

Leave a Comment