राष्ट्राध्यक्षांचे क्रेडिट कार्ड रिजेक्ट

obama
न्यूयॉर्क – सर्वसामान्यांप्रमाणेच आता जागतिक महासत्तेच्या प्रमुखालाही क्रेडीट कार्ड नाकारले जाण्याचा अनुभव आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दौऱयावर असताना एका रेस्टॉरंटमध्ये बिल भरताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे क्रेडीट कार्ड रिजेक्ट करण्यात आले. त्यामुळे ओबामांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

मी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेवेळी न्युयॉर्कमध्ये असताना, माझे क्रेडीट कार्ड रिजेक्ट करण्यात आल्याचे ओबामांनी सांगितले. क्रेडीट कार्डचे गैरव्यवहार आणि ओळख चोरी ( आयडेंटीटी थेफ्ट ) यावरील उपायांची ते माहिती देत असताना ओबामांनी या घटनेबद्दल सांगितले. आपण या प्रकाराची माहिती ग्राहक आर्थिक संरक्षण ब्युरोला दिली असल्याचेही ते म्हणाले

‘क्रेडीट कार्डचा मी कधीतरी उपयोग करतो. त्यामुळेच बिल भरताना माझे क्रेडीट कार्ड रिजेक्ट झाले असावे, असा अंदाज आहे. पण त्यांना वाटले की काही गैरव्यवहार होतोय. त्यावेळी मिशेल ओबामांकडे त्यांचे क्रेडिट कार्ड असल्यामुळे त्यांनी ते खाण्याचे बिल भरले’, असे ओबामांनी सांगितले.

Leave a Comment