नासाच्या सर्वांत मोठ्या दुर्बिणीने शोधली सर्वांत छोटी आकाशगंगा

naasa
वॉशिंग्टन – नासाच्या सर्वांत मोठ्या अवकाश दुर्बिणीने सर्वांत छोट्या आकाशगंगेचा शोध लावला आहे. या मोठ्या दुर्बिणीद्वारे शोधलेली ही आकाशगंगा सर्वांत दूर आहे. या आकाशगंगेचे अंतर १३ अब्ज प्रकाशवर्ष एवढे आहे. एका अभ्यासानुसार या आकाशगंगेपासून ब्रह्मांड बनण्याची प्रक्रिया आणि त्याच्या इतिहासाविषयी माहिती मिळू शकेल. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेच्या एडी जिट्रीन यांनी सांगितले की, हा शोध मैसिव गॅलेक्सी क्लस्टर अबेल २७४४ म्हणजे पंडोरा क्लस्टर नावाने संबोधित केले आहे. याचा शोध अद्ययावत लेंसच्या द्वारे लावण्यात आला आहे. या लेंसमधून कोणत्याही आकाशगंगेची तीन मोठी छायाचित्रे तयार करू शकतो. ही आकाशगंगा मिल्की वे आकाशगंगेपासून ८५० प्रकाशवर्ष आणि ५०० पट छोटी आहे. जिट्रीन यांच्या मते आपला छोटा आकार आणि कमी वजनामुळे ही आकाशगंगा तारे तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये समावेश होतो. यासाठी तज्ञांनी रंगाद्वारे संशोधन करण्याचा प्रयोग केला आणि त्याची अनेक छायाचित्रे काढून त्याच्या अंतराचा शोध लावला. जिट्रीनने सांगितले की, हा शोधामुळे हे सिद्ध होते की, आताही अवकाशात अशा आकाशगंगा आहेत ज्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यांचा देखील शोध लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आकाशगंगा आणि ब्रह्मांड कशाप्रकारे एकसारखे आहे याचा शोध यातून लागतो.

Leave a Comment