गूगलचे ‘लॉलीपॉप’ लाँच

google
नवी दिल्ली – गूगलने आपल्या अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमचे नवे व्हर्जन ५.० ‘लॉलीपॉप’ दीवाळीपूर्वीच लाँच केल आहे.

या नव्या अँड्रॉइड व्हर्जनसोबतच, गुगलने ‘नेक्सस-६’ आणि ‘नेक्सस-९’ ही लाँच केले आहेत. मोटोरोला कंपनीने हे मोबाइल-टॅब्लेट तयार केले आहेत.

अवघ्या १५ मिनिटांच्या चार्जिंगवर सहा तास चालू शकेल इतकी दणदणीत बॅटरी नेक्सस-६ मध्ये असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनची प्री-बुकिंग २९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. नेक्सस-६ची किंमत ४० हजाराच्या आसपास असल्याचे समजते.

गूगलने अॅपलच्या आयफोन-६ आणि सॅमसंगच्या गॅलेक्सी नोट-४ ला टक्कर देण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. म्हणूनच तर, नेक्सस-६ स्मार्टफोन आणि नेक्सस-९ टॅबलेटही बाजारात उतरवून गुगलने मोबाइलप्रेमींना एक नवा ‘हायटेक’ पर्यायही दिला आहे.

गुगल नेक्सस-६ चे फिचर्स – ६ इंची स्क्रीन, २.६५ गिगाहर्टझ कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन, ३ जीबी रॅम, १३ मेगापिक्सल रिअर, ड्युएल फ्लॅश, २ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, ३२ जीबी इंटरनल मेमरी, ६४ जीबी एक्सपांडेबल

Leave a Comment