ऍपलने लॉन्च केला आयपॅड एअर-२, आयपॅड मिनी ३

ipad
नवी दिल्ली – अग्रनामंकीत मोबाईल कंपनी ऍपलने आपले बहुचर्चित आयपॅड एअर-२, आयपॅड मिनी ३ आणि Mac ऑपरेटिंग सिस्टम ‘योसमाइट ओएस एक्स १०.१०’ लॉन्च केले. उल्लेखनिय म्हणजे, आयपॅड एअर-२, हा आधीच्या आयपॅडपेक्षाही फास्ट आणि स्लीम असल्यामुळे आयपॅड एअर २ हा जगातील सगळ्यात स्लीम टॅब असण्याची शक्यता नाकारत येत नाही. टचआयडी सुविधा आयपॅड मिनीमध्ये पहिल्यांदा देण्यात आली आहे.

आयफोनप्रमाणे हा देखील ३२ जीबीच्या व्हर्जनमध्ये मिळणार नाही. १६, ६४ आणि १२८ जीबी मेमरी असलेले आयपॅड याच महिन्यात मार्केटमध्ये दाखल होणार आहेत. अमेरिकन मार्केटमध्ये या आयपॅडची किमत ४९९ ते ६९९ डॉलर्स आहे. सेल्युलर ऑप्शन्ससाठी १३०डॉलर्स जास्त मोजावे लागतील.

आयपॅड एअर-२ ची वैशिष्ट्ये – स्क्रीन- ९.७ इंच, प्रोसेसर- ६४ बिट, ए-८ एक्स, एम-८ मोशन को-प्रोसेसर, कॅमेरा: ८ एमपी रियर, १.६ आयसाइट एमपी फ्रंट, स्टोरेज १६ ते १२८ जीबी, किमत : ३० ते ५२ हजार रुपयांपर्यंत, ३डी ग्राफिक्स सपोर्ट, वायरलेस मॅग्नेटिक फुल की-बोर्ड (पर्यायी), लॉक स्क्रीनमध्ये नोटिफिकेशन, वन हॅंड ऑपरेशनल डिझाइन, ४० लाख पिक्सल सपोर्ट, हॅनकॉम ऑफिस अॅप, मल्टी वर्किंग विंडो मोड, रिमोट पीसी कनेक्शन, एअर कमांड

Leave a Comment